पत्रकारावर भ्याड हल्ल्याप्रकरणी लोणार तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने निषेधमारहाण करणाऱ्या दोषी वर कठोर कारवाईची मागणी…

0
IMG-20260523-WA0002

लोणार (यासीन शेख)जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड राहेरी येथील वाळू घाटावर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर वाळू वाहतूकदार,कंत्राटदार व त्यांच्या साथीदारांनी दि १९ मे रोजी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पत्रकार संघटनांनी २२ मे रोजी मुख्यमंत्री तथा गृह मंत्री महाराष्ट्र राज्य यांना भूषण पाटील तहसीलदार लोणार यांच्या मार्फत निवेदन देत मारहाण करणाऱ्या दोषी वर कठोर कारवाईची मागणी केली.लोणार तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार रामदास कहाळे हे वाळू घाटावरील हालचालींचे चित्रीकरण करत असताना काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी पीडित पत्रकारावरच किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पत्रकारांवर दबाव टाकण्याचे प्रकार थांबवून निष्पक्ष चौकशी करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.निवेदनावर डॉ. अनिल मापारी, रेहमान भाई, सचिन गोलेच्छा, गोपाल तोष्णीवाल, उमेश कुटे, राहुल सरदार, श्याम सोनुने, पवन शर्मा, शेख समद, विठ्ठल घायाळ, किशोर मोरे, शेख यासिन, सुनील वर्मा, अनिल वायाळ, अशोक इंगळे, संदीप मापारी यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!