नांदुरा हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ७६ लाखांच्या मुद्देमालासह ५ टिप्पर जप्त,अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल; सावरगांव नेहू शिवारातील घटना…

0
Screenshot_2026-05-23-09-20-06-66_680d03679600f7af0b4c700c6b270fe7


बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ): जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरीत्या रेतीचे उत्खनन व चोरीची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावरगांव नेहू शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) रात्रीच्या सुमारास सापळा रचून अवैध रेतीची वाहतूक करणारे ५ टिप्पर आणि १० ब्रास रेतीसह एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाचही आरोपी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांनी दिले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक कार्यरत होते. २१ मे रोजी रात्री सावरगांव नेहू परिसरातून काही टिप्परद्वारे अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पोउपनि. पंकज सपकाळे व सहकाऱ्यांनी रात्रीच्या दरम्यान सावरगांव नेहू येथे रस्त्याची नाकाबंदी करून सापळा रचला.
या नाकाबंदी दरम्यान अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे ५ टिप्पर पोलिसांनी थांबवले. यामध्ये आरोपी चालक योगेश विजय काळे (वय ३०, रा. बेलाड, ता. मळकापूर), आकाश सुरेश भंडारकर (वय २६, रा. झोडगा, ता. मळकापूर), शुभम माणिक इंगळे (वय २६, रा. धरणगांव, ता. मळकापूर), लक्ष्मण धोंडू चव्हाण (वय ३०, रा. नेहरुनगर, ता. मोताळा) आणि प्रल्हाद सुपडा नरवाडे (वय ४२, रा. मेंढळी, ता. मोताळा) यांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले.
या कारवाईत ७५ लाख रुपये किमतीचे ५ टिप्पर आणि १ लाख रुपये किमतीची १० ब्रास रेती, असा एकूण ७६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी पो.उप.नि. पंकज सपकाळे यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि गौण खनिज कायदा कलम २१(१)(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक (बुलढाणा) अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोनि. सुनिल अंबुलकर, पोउपनि. पंकज सपकाळे, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोकॉ. अमोल शेजोळ, अजीज परसुवाले, मनोज खरडे आणि चापोकॉ. शिवानंद हेलगे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!