पुरवठा निरीक्षक डी शेख याची चौकशीची मागणी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन….

0
Spread the love

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज)सिंदखेडराजा तहसील कार्यालयामध्ये पुरवठा निरीक्षक दादुमिया शेख यांच्या कार्यकाळामधील ज्या लोकांना राशन कार्ड कुठल्याही प्रकारचा अर्ज न घेता वितरित केले त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच डी शेख यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बबन सरकटे यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ,त्यांनी पुढे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की पुरवठा निरीक्षक दादुमिया उर्फ डि शेख यांनी ओळखीच्या व जवळच्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारच्या अर्जा न घेता त्यांना तसेच राशन कार्ड वितरित केले आहे तसेच त्यांच्याकडून पैसे सुद्धा घेतले, त्यांच्या कार्यकाळामध्ये वितरित झालेल्या राशन कार्ड काढणाऱ्यांचे अर्ज किती उपलब्ध झाले व किती कार्ड वितरित केले याची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा सरकटे यांनी केली आहे,तसेच मोठा अपहार झाल्यामुळे त्यांचे खाते न्याय चौकशी सुद्धा करावी अशी मागणी बबन सरकटे यांनी केली आहे सदर मागणी पूर्ण झाल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचेही बबन सरकटे यांनी निवेदनात नमूद केले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed