जिल्ह्यात वाढली उष्णतेची लाट रसवंती वर रस पिण्यासाठी वाढली गर्दी, घराबाहेर पडताना टोपी किंवा रुमाल बांधून पडावे बाहेर, जनावरांनाही उष्माघाताचा वाढता धोका!

0
Spread the love

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज)जिल्ह्यात उष्णतेची लाट वाढलेली आहे. दि 5 मे रोजी जिल्ह्यात तापमान 38 एवढे होते. प्रचंड ऊन तापत असल्याने जिल्हा वासियांना उष्णतेचा त्रास जाणवत आहे. विशेष या महिन्यात लग्नसराईच्या तारखा दाट आहे आणि त्यामध्ये उष्णतेचा तापमानाचा काटा वाढत चाललेला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये जिकडे बघावे तिकडे नागरिक टोपी व रुमाल बांधूनच बाहेर पडत आहे. आणि बाहेर पडल्यानंतर थंड पाण्याचा गारवा घेण्यासाठी लोकांनी रसवंतीला पसंती दिली आहे. शहरासह आजूबाजूला असलेल्या रसवंतीवर नागरिक यांची गर्दी जमत आहे उसाचा थंड रस पिल्याने थंड गारवा हा नागरिकांना जाणवत आहे. तरी बाहेर पडताना विशेष काळजी घेऊनच बाहेर पडावे टोपी रुमाल बांधूनच बाहेर निघावे जेणेकरून उष्णतेचा त्रास काही प्रमाणात कमी जाणवेल. उष्णतेचा त्रास हा मानवासह जनावरांना सुद्धा प्रचंड प्रमाणात जाणवत आहे.उन्हाची तीव्रता वाढताच, जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता बळावली आहे. विशेषतः दुभत्या जनावरांना याचा धोका अधिक आहे. त्यामुळे कडक उन्हापासून जनावरांचा बचाव करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात वेळोवेळी बदल होत आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमाल तापमान ४० अंशांच्यावर गेले आहे. मे महिन्यात तापमान आणखी वाढू शकते. वातावरणातील उष्णता कायम आहे. त्यामुळे नागरिकांप्रमाणेच पशुंच्याही शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले.जनावरांना ऐन दुपारच्या वेळेत मोकळे सोडल्यास किंवा त्यांना बांधलेल्या ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवणार नाही याची प्राथमिक सध्या जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed