किनगावराजा नजीक ट्रकची टिप्परला धडक; एक ठार, एक गंभीर जखमी, मेहकर ते जालना मार्गावर झाला होता अपघात…..

0
Spread the love

किनगाव राजा (बुलढाणा माझा न्युज) मेहकर ते जालना महामार्गावर ५ मेच्या रात्री घडली. यामध्ये चालकाचा झाला मृत्यू सविस्तर वृत्त अशे की ट्रकने समोरून येत असलेल्या टिप्परला जबर धडक दिल्याने टिप्पर चालक जागी ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे घटना मेहकर ते जालना महामार्गावर किनगाव राज्याच्या जवळ ५ मेच्या रात्री घडली. यामध्ये प्रवीण भीमराव मुळे, असे मृतक चालकाचे नाव आहे.ट्रक (एमएच ४६ एएफ ६७७५) ने चालक नामे पुंजाराम श्रावण कोसरे हे जात होते. मेहकर ते जालना रस्त्यावर टिप्पर (एमएच २८ बीबी १४३१) ला ट्रक समोरून जबर धडक दिली. यामध्ये प्रवीण मुळे हे जागीच ठार झाले तर ट्रकचालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी बाळकृष्ण काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगावराजा पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed