दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात, बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई….

0
Spread the love

जळगाव जामोद (बुलढाणा माझा न्युज ): जळगाव जामोद येथील एका व्यक्तीने सालई गोंद अवैधरीत्या जमा केला होता त्यामुळे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण हा गुन्हा सिद्ध न व्हावा म्हणून त्या व्यक्तीतून दहा हजाराची लाचेची मागणी करण्यात आली होती सविस्तर वृत्त अशे की वन गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध न व्हावा, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील वनपालाने दहा हजारांची लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ मे रोजी सापळा रचून वनपाल शेख कलीम शेख बिबन (वय ४८) याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याच्यावर जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, जळगाव जामोद येथे वनविभागाच्या अखत्यारितील सालई गोंद अवैधरीत्या जमा केल्याने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल होता. त्या व्यक्तीविरुद्ध आरोप सिद्ध न व्हावा, यासाठी वनपाल शेख कलीम शेख बिबन याने दहा हजारांची मागणी केली होती याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यांची माहिती मिळाली
त्यांनतर ६ मे रोजी जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी वनपाल शेख कलीम याला दहा हजारांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय बुलढाणा येथील पोलिस उपअधीक्षक शीतल घोगरे, निरीक्षक सचिन इंगळे, सहायक फौजदार श्याम भांगे, हवालदार प्रवीण बैरागी, हवालदार विनोद लोखंडे, जगदीश पवार, रणजित व्यवहारे, चालक हवालदार नितीन शेटे, हर्षद शेख यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed