प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा, रविकांत तुपकर यांची निवडणूक आयोगाकडे मागणी; मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा असल्याचे पत्रात केले नमूद….

0
Spread the love

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज) बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून यासाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश मा. सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, मतदान प्रक्रियेचे झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे, त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी या संदर्भातील निवेदन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. या निवेदनात नमूद आहे की, मी स्वतः अपक्ष म्हणून “पाना” या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढविली आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान पार पडले आहे. मतदानाच्या मतदान कक्षामध्ये मतदान निपक्षपातीपणे, मोकळ्या वातावरणात व कायदेशीरपणे पार पडते आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी सर्व मतदान कक्षांमध्ये मतदानाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघा करिता २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची सरासरी ही ५० ते ५५ टक्के पर्यंत होती. मात्र अखेरच्या एका तासामध्ये मतदानाच्या टक्केवारी मध्ये आकस्मिकपणे दहा टक्क्यांची वाढ झालेली आहे. सदर मतदान हे रात्री उशिरापर्यंत चालल्याचे कळते. त्यामुळे सर्व मतदान केंद्रावरील अखेरचे मतदान होऊन मतपेट्या सीलबंद करेपर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. झालेले मतदान हे योग्य प्रकारे झालेले आहे किंवा नाही हे पाण्यासाठी सर्व मतदान केंद्रांमध्ये झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सदर व्हिडिओ रेकॉर्डिंग हे मतदानाची वैधता सिद्ध करणारा एकमेव पुरावा आहे त्यामुळे, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेचे करण्यात आलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed