माझं माहेर… माझा अभिमान!” सावंगी टेकाळे येथे लेकींचा अभूतपूर्व सन्मान सोहळा;समाजाने महापुरुषा च्या विचाराची कास धरावी = आमदार सिद्धार्थ खरात यांचे प्रतिपादन झोटे परिवाराच्या उपक्रमाने भावनांचा पूर….

सिदखेडराजा (अनिल दराडे ) आपल्या समाजाला महापुरुषा च्या विचारांची अत्यंत गरज असून महापुरुषा चे विचारच आपल्याला तारु शकतात कारण आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. बाकी कोणी करो किंवा नाही मात्र आपल्याला हा विचार पुढे न्यायचा आहे या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारामुळे च आपली प्रगती झाली आहे त्यामुळेच आपण आपल्या आयुष्यात प्रगती करा शिक्षण घ्या असे शिक्षण घ्या त्याची सर्वत्र चर्चा झाली पाहिजे आशा विविध मुद्यावर आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सावंगी टेकाळे तालुका देऊळगाव राजा येथे दिनांक 19 एप्रिल रोजी झोटे परिवार स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिद्धार्थ खरात हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सर्व झोटे परिवराच्या लेकी होत्या.आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात अनेक नाती काळाच्या ओघात विरळ होत चालली असताना, सावंगी टेकाळे गावात झोटे परिवाराने एक असा उपक्रम राबवला की, संपूर्ण पंचक्रोशीत त्याची चर्चा रंगली आहे. “लेकी म्हणजे ओझं नव्हे, अभिमान आहे” हा संदेश देत झोटे परिवाराने छोट्या-मोठ्या सर्वच लेकींना एकत्र बोलावून त्यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित केला.या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात लेकींना फेटे बांधून, सनई-चौघड्यांच्या मंगलमय सुरांत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक वळण जणू “लेकींच्या गौरवाचा साक्षीदार” ठरला. मिरवणुकीदरम्यान उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदाच्या जल्लोषात अनेक लेकींचे डोळे नकळत पाणावले.झोटे परिवाराने प्रत्येक लेकीला बुद्ध विहाराची प्रतिमा व फोटो देत सहकुटुंब सन्मानित केले. हा केवळ सन्मान नव्हता, तर लेकींप्रती असलेला जिव्हाळा, माया आणि आदर व्यक्त करण्याचा एक भावनिक सोहळा होता.कार्यक्रमात “माझं माहेर माझा अभिमान, सासर माझं सौभाग्य” या आकर्षक सेल्फी पॉईंटने विशेष लक्ष वेधून घेतले. “मला तुमच्या मुळे पंख मिळाले”, “माझे माहेर माझा जिव्हाळा” अशा भावना व्यक्त करणाऱ्या ओळींनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.या निमित्ताने अनेक महिलांनी आपल्या माहेरच्या, सावंगीतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी आपल्या सासर-माहेरच्या गोड-तिखट आठवणी सांगताना शब्द अडखळले, तर काहींच्या डोळ्यांतून अश्रूंचा ओघळ अनावर झाला. “हेच ते अंगण, जिथे आम्ही खेळलो… हेच ते गाव, जिथे आमचं बालपण फुललं…” अशा भावना व्यक्त करताना वातावरण अक्षरशः भारावून गेले.संपूर्ण देशात महिला सक्षमीकरणाचे नारे दिले जात असताना, सावंगी टेकाळे येथील झोटे परिवाराने कृतीतून लेकींचा सन्मान करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. हा सोहळा केवळ कार्यक्रम नव्हता, तर लेकींप्रती असलेली नितांत प्रेमाची आणि अभिमानाची जिवंत साक्ष होती. या कार्यक्रमाचे अयोजनासाठी झोटे परिवराच्या सर्व कुटुंबानी मेहनत घेतली. व्यासपीठावर पृथ्वीराज तायडे ,वसंत शेजुळ याची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी सभापती सुधाकर झोटे व पोलीस उपनिरीक्षक आनंद झोटे यांनी तर सूत्रसंचालन व आभार पत्रकार देवानंद झोटे यांनी केले…….
लेकीचा फेटे बांधून आपल्या माहेरच्या बुद्ध विहाराची प्रतिमा देत सन्मान करत सनई-चौघड्यांत भव्य मिरवणूक काढण्यात आली.“माझं माहेर माझा अभिमान” सेल्फी पॉईंट आकर्षण आठवणींनी महिलांचे डोळे पाणावलेपंचक्रोशीत उपक्रमाची जोरदार चर्चा— “लेकी वाचवा” पासून “लेकींचा सन्मान करा” पर्यंतचा प्रवास सावंगी टेकाळेने कृतीतून दाखवून दिला!……
