महावितरणचे विद्युत खांब धोकादायक ; ४० फुटाचा विद्युत खांब कोसळला…..! सुदैवाने जीवितहानी टळली…..!
निलेश कोल्हे
चिखली:- तालुक्यातील धोडप येथे दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायं. ५ वाजेच्या सुमारास नवीन विद्युत जोडणी चालू असलेल्या ४० फुटाचा विद्युत खांब रस्त्यावर कोसळला.सुदैवाने जीवित हानी टळली गेल्या महिन्याभराच्या अगोदर पासून लावण्यात आलेले विद्युत काम धोकादायक ठरत आहे . धोडप येथे सध्या रस्त्याचे काम चालू झाले आहे व सध्या नाली बांधकाम चालू आहे नाली बांधकाम करण्यासाठी खोदण्यात आल्याने त्यामुळे लावण्यात आलेली विद्युत खांब अगदी दोन ते तीन फुटावरती उभे आहेत त्यामुळे हवेचा झोक आल्यावरती विद्युत काम खाली कोसळत आहे असे अनेक खांब हवेच्या झोकाने हलत आहे. १९ एप्रिल रोजी अशोक हिम्मतराव कोल्हे यांच्या घरासमोरील विद्युत खांब हा हवेच्या झोकांनी समोरील राहत असल्याले सदाशिव श्रीराम कोल्हे यांच्या घराच्या गेट समोर कोसळला सदाशिव कोल्हे यांच्या घरातील महिला गेट समोर बियाणे चाळणी करीत असताना अचानक त्यांच्यासमोर एक फुटाच्या अंतरावर विद्युत खांब कोसळला व प्रचंड मोठा आवाज झाला सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही मोठी दुर्घटना टळली आणखी काही विद्युत खांब कोसळण्या अगोदर धोकादायक झालेले विद्युत खांब तात्काळ काढण्यात यावे व नाली बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी प्रशासनाकडे व दोन्ही कंत्राटदारांन कडे गावकरी नागरिक करीत आहे.
