समृद्धी महामार्गावर ‘रील्स’च्या वेडापायी दीड वर्षाच्या चिमुकल्याचा बळी; २५ प्रवासी जखमी​चालकाचा बेजबाबदार पणा: मुंबई-पुसद बसचा मेहकरजवळ भीषण अपघात…..​

0
Screenshot_2026-04-19-12-15-10-97_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

मेहकर ( बुलढाणा माझा न्युज ) –समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबत नसून, आज पहाटे मेहकर टोल नाक्याजवळ एका खासगी प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. चालक आणि वाहक मोबाईलवर ‘रील्स’ बनवण्यात मग्न असल्यामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक आरोप प्रवाशांनी केला आहे. या अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले असून, ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस (मुंबई ते पुसद) समृद्धी महामार्गावरून जात असताना सकाळी ६ वाजेच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. बस चालकाचे लक्ष विचलित झाल्याने बस समोरून जाणाऱ्या कारवर जोरदार आदळली. हा धडक इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर बसमधील प्रवासी सीटवरून फेकले गेले. यात एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच अंत झाला.अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त करत सांगितले की, बस धावत असताना चालक आणि क्लिनर मोबाईलवर व्हिडिओ शूट करत होते आणि रील्स बनवत होते. सोशल मीडियाच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अनर्थ घडला. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.बेजबाबदारपणे वाहन चालवून निष्पाप बालकाचा बळी घेणाऱ्या बस चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा अधिक तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!