NCERT विरोधात जागर प्रतिष्ठानचा इशारा; सिंदखेडराजा येथे निवेदन सादर…

0
Screenshot_2026-04-21-09-33-52-89_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा( बुलढाणा माझा न्युज ) येथे जागर प्रतिष्ठानच्या वतीने NCERT विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तालुका अध्यक्ष विठोबा झगरे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले.या निवेदनात NCERT ने शालेय अभ्यासक्रमातील इतिहास विषयात, विशेषतः मराठा साम्राज्याच्या नकाशात केलेले बदल तत्काळ पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा बदल इतिहासाचा अवमान करणारा असून विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देणारा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.विठोबा झगरे यांनी सांगितले की, “मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास हा आमच्या अस्मितेचा भाग आहे. तो कोणत्याही परिस्थितीत विकृत किंवा कमी करून चालणार नाही. NCERT ने तात्काळ दुरुस्ती न केल्यास जागर प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”यावेळी जागर प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जागर युवा पर्वाचा, लढा आपल्या सर्वांचा” या घोषवाक्याने परिसर दुमदुमून गेला.जागर प्रतिष्ठानने प्रशासनाला दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!