आंतरराष्ट्रीय खेळाडू भक्ती आंब्रे यांनी स्वीकारला जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार

0
IMG-20260417-WA0065

सिंदखेडराजा( अनिल दराडे) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये दि. 15 एप्रिल 2026 रोजी आंतरराष्ट्रीय पावरलिफ्टींग खेळाडू तथा ‘स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया’ किताब प्राप्त, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी भक्ती अजित आंब्रे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा या पदाचा कार्यभार स्वीकारला.आंब्रे या यापूर्वी तालुका क्रीडा अधिकारी, पालघर येथे कार्यरत होत्या. शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत पदोन्नती देत त्यांची बुलढाणा येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पावरलिफ्टींग या खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीमुळे त्यांना ‘स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया’ हा विशेष किताब तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.स्वतः एक यशस्वी खेळाडू असल्यामुळे जिल्ह्यातील पावरलिफ्टींगसह विविध क्रीडा प्रकारांना चालना देत खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भक्ती आंब्रे यांनी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी बि. एस. महानकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!