क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील जयंतीनिमित्त सिंदखेडराजात अभिवादन! समाजप्रबोधनाच्या विचारांची उजळणी; “जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभु”चा जयघोष….

0
IMG-20260416-WA0042

सिंदखेडराजा(अनिल दराडे ) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील शिवाजीनगर चौकात क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.शिवाजीनगर टी पाँइंट चौकात येथे सकाळी ११.३० वाजता आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील हे सामाजिक परिवर्तनासाठी झटणारे, शेतकरी व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी समाजप्रबोधन, शिक्षण प्रसार आणि संघटनात्मक कार्याच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या विचारांमुळे अनेक तरुणांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली आहे.कार्यक्रमावेळी “जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभु”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी अण्णासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद टेके, कार्याध्यक्ष कृष्णा कोल्हे, संतोष राजे जाधव, बाळासाहेब शेळके, संजय उगले, विठ्ठलराव उगले, सुदाम मामा कळकुंबे, प्रल्हाद राठोड, बाबासाहेब पुरंदरे, अर्जुन राजे जाधव, दीपक भुसारे, कृष्णा वायाळ यांच्यासह छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थितांनी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!