बिबीत पिण्याचे पाणी विकत घेऊनच भागवावी लागते तहान लाखो रुपयांची नळ योजना नावापुरतीच ग्रा. पं ने पाणी उपलब्ध करून न दिल्यास वंदना पटावकर यांनी दिला उपोषणाचा इशारा…
सिंदखेडराजा (अनिल दराडे) बिबी तालुका लोणार येथील सर्व गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात या गावांमध्ये लाखो रुपयांची पाणीपुरवठा योजना झाली पण गावाला काही पिण्याचे पाणी मिळाले नाही काही दिवसापूर्वी नवीन पाईपलाई चे काम केले पण निकृष्ट दर्जाचे झाले असल्याकारणाने जागोजागी लिकेज झाली आहे गावामध्ये पंधरा-वीस दिवसानंतर नळ येतात पण त्या नळालाही दुर्गंधीयुक्त पाणी येते त्यामुळे पिण्यास योग्य नाही आता सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असून गावामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे दैनंदिन लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला पैसे मोजून पाणी विकत आणावे लागत आहे या ठिकाणी गरीब कुटुंबांना रोजगार नाही दररोज पाणी विकत घ्यायची कसे गावात कुठे पिण्यायोग्य पाणी सुद्धा नाही गावातील काही हातपंप आहेत ते सुद्धा नादुरुस्त आहेत ग्रामपंचायत अधिकारी यांना पिण्यायोग्य पाण्यासाठी विचारले असता त्यांनी वरिष्ठांना कळवितो असे सांगितले येत्या पाच दिवसांमध्ये पिण्यायोग्य स्वच्छ पाण्याचा पुरवठा गावकऱ्यांना न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन वंदना पटावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मध्ये ग्रामपंचायत अधिकारी अमोल मोरे यांना दिले आहे उपोषणादरम्यान होणाऱ्या बऱ्या वाईट घटना बद्दल संबंधित ग्रामपंचायत कार्यालय जबाबदार राहील
