मराठा सेवा संघाच्या चिखली तालुकाध्यक्षपदी माजी प्राचार्य नंदकिशोर गायकवाड यांची निवड…
चिखली( एकनाथ माळेकर)शासकीय विश्रामगृह, चिखली येथे मराठा सेवा संघाची बैठक जिल्हाध्यक्ष तथा माजी कार्यकारी अभियंता रविकांतजी काळवाघे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत चिखली तालुका मराठा सेवा संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच माजी प्राचार्य नंदकिशोर शेषराव गायकवाड यांची मराठा सेवा संघाच्या चिखली तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणीतील ईतर पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत : सुरेश शिवसिंग इंगळे (कार्याध्यक्ष), अर्जुनराव तुकाराम इंगळे (उपाध्यक्ष), बाळासाहेब रावसाहेब ठाकरे (उपाध्यक्ष), शेख चाँद शेख गुलाब (सचिव), अरुण दगडूजी गरुड (सहसचिव), मोहन पंजाबराव ठोसरे (सहसचिव), जीवन सूर्यभान शेटे (कोषाध्यक्ष), दशरथ रामचंद्र सावळे (प्रसिद्धी प्रमुख) आणि अॅड. सलीम शेख (विधी सल्लागार).यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रविकांतजी काळवाघे यांनी सांगितले की, नूतन तालुकाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांना मराठा सेवा संघाच्या विचारांचा वारसा त्यांचे वडील स्वर्गीय शेषरावजी गायकवाड (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, बुलढाणा) यांच्याकडून लाभला आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चिखली तालुक्यात मराठा सेवा संघाच्या विचारांना व कार्याला निश्चितच नवी उभारी मिळेल आणि ही चळवळ अधिक जोमाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी रविकांतजी काळवाघे तसेच माजी गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर यांनी मराठा सेवा संघाचे विचार समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.नूतन तालुकाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मराठा सेवा संघाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली.तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच रविकांतजी काळवाघे यांनी गायकवाड यांचा सत्कार करून त्यांना प्रसिद्ध साहित्यिक आ.ह. साळुंखे यांनी लिहिलेले “शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात” हे पुस्तक भेट दिले.या बैठकीस माजी गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर, प्राचार्य सुनील देशमुख, राजू काकडे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), प्रा. डी. आर. सावळे तसेच सौरभ शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रा. डी. आर. सावळेप्रसिद्धी प्रमुख,मराठा सेवा संघ, तालुका चिखली
