Screenshot_2026-04-22-08-02-04-73_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

प्रतिनिधी:-रामेश्वर तोंडे लोणी गवळी

मेहकर :- लोणी गवळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी बिबट्याचा वासरावर हल्ला. लोणी गवळी या शिवारात भाग एक या ठिकाणी मुरलीधर तोंडे यांच्या शेतात बिबट्याने वासरावर दिनांक 19/4/2026 च्या रात्री हल्ला केला. लोणी शिवारामध्ये बिबट्याचा सतत वावर असल्यामुळे दहशत निर्माण होत आहे.आणि शेतकऱ्यांचे या अगोदर सुद्धा एक दोन गुरे बिबट्याने खाल्याची घटना घडली आहे. याची नोद घाटबोरी फॉरेस्ट ऑफिसला वारंवार शेतकऱ्यांनी लेखी आव्हान देऊन सुद्धा याच्यावर काही उपाययोजना केली नाही. लोणी शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांची उन्हाळ्यामध्ये गुरे शेतात बाहेर असतात. या बिबट्याच्या भीतीमुळे शेतात जाणे कठीण होत आहे तरी शासनाने याची दखल घेण्यात यावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!