कर्तव्य दक्ष गट विकास अधिकारी अजित बांगर यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे
सिंदखेडराजा( अनिल दराडे )दुसरबीड ता. सिंदखेडराजा ग्रामपंचायतीत सरपंच-सचिवांच्या मनमानी कारभाराविरोधात उपसरपंच अशोक गुंजाळ यांनी आमरण उपोषणाचा बडगा उगारताच जिल्हा परिषदेचे प्रशासन ताळ्यावर आले. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी आज तातडीने जिल्हा स्तरीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश काढले. *उपसरपंचाचा एल्गार*उपसरपंच अशोक नागोराव गुंजाळ व इतर सदस्यांनी 15 एप्रिल रोजी लेखी तक्रार देऊन सरपंच व सचिवांनी बेकायदेशीर कामे केल्याचा आरोप केला होता. चौकशी होऊन कारवाई न झाल्यास थेट उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची धास्ती घेत प्रशासनाने पाच दिवसांतच समिती गठीत केली.1. अध्यक्ष: शरद रमेशराव घुगे, सहा. गटविकास अधिकारी, पं. स. लोणार2. सदस्य: ज्ञानेश्वर गणपत चनखोरे, विस्तार अधिकारी (पं.), पं. स. लोणार आदेशात काय?*सदर समितीने तक्रारदार गुंजाळ यांना सोबत घेऊन समक्ष स्थळ चौकशी करावी. अहवाल तात्काळ जिल्हा परिषदेला सादर करावा, असे स्पष्ट निर्देश सीईओ खरात यांनी दिले आहेत.विशेष म्हणजे आदेशावर हाताने लिहिलेल्या शेऱ्यात “चौकशी पार पडल्यानंतर ग्रामपंचायतच्या सत्ताधारी बदलाची कार्यवाही केली जाईल” असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीत दोष सिद्ध झाल्यास दुसरबीडमध्ये सत्तांतर अटळ मानले जात आहे.दुसरबीडच्या राजकारणाला आता वेगळे वळण लागणार का? चौकशी समितीच्या अहवालाकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे लागले आहेत.
