सायकलींच्या चाकांवर स्वप्नांना पंख!” — २५ मुलींच्या शिक्षणाला नवी झेप, सिंदखेड राजातील अभिमानास्पद उपक्रम

0
IMG-20260422-WA0060

सिंदखेड राजा( अनिल दराडे) महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, सिंदखेड राजा येथे आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी . 2024-25 या शैक्षणिक वर्षातील २५ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे केवळ सायकलीच नव्हे, तर मुलींच्या शिक्षणाला वेग, आत्मविश्वासाला बळ आणि स्वप्नांना नवी दिशा मिळाली आहे. हा क्षण संपूर्ण विद्यालयासाठी अभिमानाचा आणि भावनिक ठरला.ग्रामीण भागातील अनेक मुलींना शाळेत जाण्यासाठी दररोजच्या प्रवासाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत सायकल ही केवळ साधन नसून त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीतील महत्त्वाचा साथीदार ठरणार आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडथळे दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास उंचावणार आहे.या यशस्वी उपक्रमामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. भागोजीराव तायडे, सचिव श्री. त्र्यंबकराव ठाकरे, उपाध्यक्ष श्री. सतीश तायडे आणि संचालक श्री. अतिश तायडे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभले.विद्यालयाचे प्राचार्य श्री. रामप्रसाद ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. माजी पर्यवेक्षक पि. यू. म्हस्के व सध्याचे पर्यवेक्षक श्री. मित्तल मेहेत्रे यांचे सहकार्यही उल्लेखनीय ठरले.विद्यार्थिनींना माजी वर्गशिक्षक पठाण सर व गीते सर यांचे मार्गदर्शन लाभले, तर सध्याचे वर्गशिक्षक श्री. ए. एम. तायडे यांनी दिलेली प्रेरणादायी भेट विद्यार्थिनींसाठी विशेष ठरली.या संपूर्ण उपक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे. सायकलींच्या या छोट्याशा चाकांमधून उभा राहणारा मोठा बदल आता या मुलींच्या उज्ज्वल भविष्यात नक्कीच दिसून येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!