समृद्ध पंचायतराज अभियान मूल्यांकनसाठी सिंदखेडराजा पंचायत समिती मधील ग्रामपंचायती सज्ज….

0
IMG-20260422-WA0082

सिंदखेडराजा (अनिल दराडे )महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वकांक्षी समृद्ध पंचायत राज अभियान योजना गेल्या वर्षी सुरु केली. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मधील विविध कामे चांगल्या पद्धतीने करून, ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा लावण्यात आली. यानुसार गेले 5 6 महिने वेगवेगळ्या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये अनेक सार्वजनिक व वैयक्तिक कामे हाती घेण्यात आली. सिंदखेड राजा तालुक्यात 16 ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रामुख्याने वरुडी, सवडत , दरेगाव, झोटिंगा, शेंदुर्जन, रुम्हना, महारखेड सह इतर ग्रामपंचायती यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तेथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार राज्यभरात एका तालुक्यातील ग्रामपंचायतींचे परीक्षण दुसऱ्या तालुक्यातील टीम मार्फत 26 एप्रिल ते 15 मे दरम्यान होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतचे मूल्यांकन ऑनलाईन 25 एप्रिल पर्यंत भरले जाणार आहे. मूल्यांकन भरण्यासाठी मार्गदर्शन व आढावा बैठक पंचायत समितीमध्ये आज पार पडली. गट विकास अधिकारी अजित बांगर विस्तार अधिकारी भास्कर घुगे, राजेंद्र पवार, रंगनाथ गावडे, अमृता शिंदे, आटोळे व ग्रामपंचायत अधिकारी यांची उपस्थिती होती.अनेक ग्रामपंचायती व ग्रामपंचायत अधिकारी यांनी चांगली तयारी केली असून, तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर आपल्या ग्रामपंचायती बक्षीस मिळवतील अशी आशा आहे असे गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!