हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी वरवंडमध्ये ‘पोकरा’चा हुंकारशेतकऱ्यांना दिले हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; बीबीएफ आणि टोकन यंत्राच्या वापराचे महत्त्व पटवून दिले

0
Screenshot_2026-04-23-13-50-46-05_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

​बुलढाणा (ओम पाटील):बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसाय धोक्यात येत असताना, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाचा मार्ग दाखवण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा २ अंतर्गत मौजे वरवंड येथे गुरुवारी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान’ (CRT) प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची गुरुकिल्ली देण्यात आली.

​आधुनिक अवजारांवर भरसकाळी ८:३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी सतीश सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. प्रामुख्याने रुंद वरंबा सरी (BBF) पद्धतीचे फायदे सांगताना, कमी पावसात ओलावा टिकवणे आणि अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा करणे यावर भर देण्यात आला. तसेच टोकन यंत्राद्वारे (Dribbling Method) पेरणी केल्यास बियाण्यांची होणारी बचत आणि झाडांची योग्य वाढ याबद्दल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून माहिती देण्यात आली.​खर्च कमी, उत्पादन जास्तआजच्या काळात वाढता मशागतीचा खर्च पाहता ‘शून्य मशागत तंत्रज्ञान’ आणि जोखीम कमी करण्यासाठी ‘आंतरपीक पद्धती’ किती महत्त्वाची आहे, याचे मार्गदर्शन तंत्रज्ञान समन्वयक महेश जाधव यांनी केले. कृषी ताई सरला जाधव, समूह सहाय्यक मनीषा पांडे आणि कृषी मित्र विशाल जेऊघाले यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या तांत्रिक शंकांचे निरसन केले.​शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसादया मोहिमेत वरवंड परिसरातील लोकप्रतिनिधींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कृषी विभागाच्या या पुढाकारामुळे नवीन हंगामात पेरणीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. सहाय्यक कृषी अधिकारी सतीश सोनुने यांनी प्रात्यक्षिक व मोहिमेचे यशस्वी नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!