एक मे कामगार दिणी मधुकर शिंदे यांचे आमरण ऊपोषण सुरू

0
IMG-20260501-WA0047

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) पळसखेड चक्का येथील महाजल योजनेत बोगस कामे करणाऱ्या ठेकेदाराचे लायसन्स रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीसाठी मधुकर किसन शिंदे यांनी आज, १ मे २०२६ रोजी ‘आमरण उपोषणा’चे हत्यार उपसले आहे. १० एप्रिलच्या निवेदनातच त्यांनी ठेकेदाराचे बिल अदा केल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाने दखल न घेतल्याने शिंदे आज कामगार दिनीच उपोषणाला बसले आहेत.निवेदनातील ‘बॉम्बगोळे’१०/०४/२०२६ रोजी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, सिंदखेडराजा यांना दिलेल्या तक्रार अर्जात शिंदे यांनी महाजल योजनेचे ‘तीन तेरा’ वाजल्याचा आरोप करत बोगस कामांचा पाढाच वाचला आहे.1. टाकी पूर्ण लिकेज: गावातील पाण्याची टाकी पूर्णपणे नादुरुस्त. सिमेंटचे कोनाडे वापरले, पूर्णपणे लिकेज. पाणी थांबतच नाही.2. खडकात बोगस विहीर:शिवारात भरपूर पाणी असताना खडकात विहीर खोदली. जी जागा घेतली तिथे विहीर का घेतली नाही?3. ७ किमी बोगस पाईपलाईन: गावात कामासाठी ७ किलोमीटर पाईप लाईन कशासाठी? ती पूर्णपणे बोगस. खोली किती व कोणत्या कंपनीचे पाईप टाकले, याचे इस्टिमेंट द्या.4. दोन गावचे पाईप एकाच नालीत: एका नालीमध्ये दोन गावचे पाईप टाकले आहेत.लायसन्स रद्द करा, काळ्या यादीत टाका’ – थेट मागणी*”सदर ठेकेदार यांचे कोणतेही बिल अदा करू नये. बिल अदा केले तर आपले कार्यालय जबाबदार राहील व कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल,” असा इशारा देताना शिंदे यांनी टिपमध्ये स्पष्ट मागणी केली आहे: *”सदर ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून बिल अदा करण्यात येऊ नये.”**मंत्री ते आमदारांपर्यंत प्रती, पण कारवाई शून्य*या निवेदनाच्या प्रतिलिपी जलसंधारण मंत्री, मुंबई, आमदार मनोजभाऊ कायंदे व जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनाही पाठवल्या होत्या. १३/०४/२०२६ रोजी आवक लिपीकाकडे अर्ज दाखल होऊनही ठेकेदारावर कारवाई न झाल्याने शिंदे यांनी आजपासून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.लाखो रुपये खर्चूनही गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडत असल्याने संताप उसळला आहे. ‘कामगार दिनी’च पाण्यासाठी आणि बोगस ठेकेदाराविरोधात उपोषणाची वेळ यावी, ही शोकांतिका आहे. आता तरी प्रशासन बोगस ठेकेदाराचे लायसन्स रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकणार का, याकडे पळसखेड चक्कावासियांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!