​स्व. भास्कर रावजी शिंगणे विद्यालयाची निकालात ‘हॅट्ट्रिक’; तिन्ही शाखांचा निकाल १०० टक्के!​

0
Screenshot_2026-05-02-14-24-28-89_8103d34b31ccde8855577b732f573a6d

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ):स्थानिक स्व. भास्कर रावजी शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या निकालात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य अशा तिन्ही शाखांमध्ये १००% निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्वल केले आहे.संकेत जेउघाले प्रथम​विज्ञान शाखेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट लागला आहे. संकेत संतोष जेउघाले याने ९०% गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यापाठोपाठ कु. स्नेहल देवकिसन जैन (८५%) हिने द्वितीय, तर प्रज्वल राजेंद्र खडके (८४%) याने तृतीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, विज्ञान शाखेतील ३० विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवले असून एकूण ५४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.कला व वाणिज्य शाखेचीही दैदिप्यमान कामगिरी​कला शाखेत कु. अर्चना बबन गुंजाळ ७२% गुण मिळवून प्रथम आली, तर कु. वैष्णवी भीमराव ढोरे हिने ७१% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेत सूर्यकांत गजानन जाधव याने प्रथम क्रमांक पटकावत यशाची परंपरा कायम ठेवली. तिन्ही शाखांच्या १००% निकालामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.​या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेशराव देशमुख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. विद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक वृंदानेही विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!