एल.टी.टी. बल्लारशहा रेल्वेला शेगांव येथे थांबा मंजुर… केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव दाखविणार शेगाव रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी….

0
Screenshot_2026-05-05-20-58-44-64_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज )संतनगरी शेगांव रेल्वे मार्गाने नियमीत धावणाऱ्या परंतु थांबा नसणाऱ्या एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेसला शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा मंजुरी केला आहे उद्यापासून ही गाडी आता शेगाव रेल्वे स्थानकावरही थांबणार आहे शेगाव रेल्वे स्थानकावरून या गाडीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे हिरवी झेंडा दाखवणार आहेविदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या बुलढाणा जिल्हयातील संत नगरी शेगांव येथे दररोज देशभरातुन लाखो भाविक येत असतात. शेगांव रेल्वे मार्गावरील नियमीत धावणाऱ्या एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेस या सुपर फास्ट एक्स्प्रेसला शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी केंद्रिय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी गेल्या महिन्यामध्ये केंद्रिय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन केली होती. त्यातील एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेसला रेल्वे मंत्रालयाच्या वतीने थांबा मंजुर करण्यात आला आहे. त्यासंदर्भाचे नोटिफिकेशन रेल्वे विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे .उद्यापासून ही गाडी मुंबईवरून बल्लारशाकडे जाताना सकाळी 6 वाजता आणि बल्लारशावरून मुंबईकडे जाताना ही गाडी रात्री 8 वाजता मिनिटांनी शेगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे उद्या 6 मे रोजी रात्री आठ वाजता या गाडीला शेगाव रेल्वे स्थानकावरून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे हिरवी झेडी दाखविणार आहे .. या सुपरफास्ट गाडीमुळे शेगावला दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आणि जिल्ह्यातील नागरिकांनाही या रेल्वे सेवेचा फायदा होणार आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!