उदयनगर उपविभाग मधून श्री दिपक साहेबराव सावळे यांना 1 मे कामगार दिनी गुणवंत कामगार पुरस्कार 2026 प्रदान…
चिखली (एकनाथ माळेकर)1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने मला महावितरण अकोला परिमंडळ अकोला कडून गुणवंत कामगार पुरस्काराने सहकुटुंब सन्मानित करण्यात आले. सदर चा पुरस्कार मुख्य अभियंता अकोला श्री. राजेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी माझे शाखा अभियंता, मां.उपकार्यकारी अभियंता, मां.कार्यकारी अभियंता व मा. अधीक्षक अभियंता बुलढाणा मंडळ आपण सर्वांनी मला या पुरस्कारासाठी योग्य समजले त्याबद्दल मी आपले विशेष आभार मानतो,विशेष धन्यवाद माझे सहकारी मित्र.आणि सर्व मित्र परिवार यांचे सुद्धा खुप खुप आभार..आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच पुढे सुद्धा योग्य व गुणवत्तापूर्ण काम करण्याची मला प्रेरणा मिळेल. गुणवंत कामगार पुरस्कार देताना खूप पारदर्शक पद्धतीने संपूर्ण वर्षात उत्कृष्ट कामगिरी, अपघात विरहित काम , दर्जेदार ग्राहक सेवा, विज बिल वसुली अशा सर्व बाबींचा विचार करून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार मिळाल्यामुळे श्री दिपक सावळे यांचे सर्वच ठिकाणाहून कौतुक केले जात आहे.
