प्रशासनाचा ‘ऑन द स्पॉट’ निकाल; महाराष्ट्र दिनी किन्ही सवडतच्या शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा!​तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली ३ किमी पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी; १६ शेतकऱ्यांना मोठा दिलासा​…

0
IMG-20260503-WA0002

चिखली (एकनाथ माळेकर):महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रशासनाने केवळ औपचारिकता न पाळता प्रत्यक्षात जमिनीवर उतरून काम करण्याचा आदर्श किन्ही सवडत येथे घालून दिला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला किन्ही सवडत ते निमखेड धरण हा पांदण रस्ता उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन खुला करण्यात आला. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे १६ शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न सुटला असून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.​जागेवरच तक्रारींचे निवारणकिन्ही सवडत परिसरातील या पांदण रस्त्याबाबत काही तांत्रिक अडचणी आणि तक्रारींमुळे काम रखडले होते. मात्र, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी श्री. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय सवडे यांनी संपूर्ण महसूल यंत्रणेसह गावात धाव घेतली. यावेळी संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले.​३ किमीचा रस्ता, १६ शेतकऱ्यांना लाभतहसील प्रशासनाने दाखवलेल्या या धडक कृतीमुळे सुमारे ३ किलोमीटर लांबीचा रस्ता वहिवाटीसाठी मोकळा झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा रस्ता खुला झाल्याने परिसरातील १६ शेतकऱ्यांना आता आपली शेती अवजारे आणि पीक ने-आण करणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाच्या या ‘लोकाभिमुख’ भूमिकेचे मनापासून स्वागत केले.​’चिखली पॅटर्न’ची प्रभावी अंमलबजावणीयावेळी बोलताना तहसीलदार विजय सवडे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘चिखली पॅटर्न’ अंतर्गत पांदण रस्ते खुले करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीसाठी रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा निर्धार कायम ठेवून तालुक्यातील जास्तीत जास्त रस्ते मोकळे केले जातील.”​प्रशासकीय उपस्थितीया मोहिमेदरम्यान नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, मंडळ अधिकारी एम. पी. सवडतकर, ग्राम महसूल अधिकारी गीते यांच्यासह महसूल कर्मचारी आणि किन्ही सवडत येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!