श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम….
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या फेब्रु. / मार्च २०२६ च्या इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली असून १२ वी वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ९६ टक्के लागला आहे.वाणिज्य शाखेत कु. भाग्यश्री श्रीराम बन्सीले हिने ८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. ऋतुजा रामेश्वर शिराळकर हिने ७८.३३ टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक आणि ७३ टक्के गुण मिळवून कु. गौरी दादाराव कासारे हिने तृतीय क्रमांक पटकविला आहे.कला शाखेतून ६७.५० टक्के गुण मिळवून शिवम सुदाम पालवे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक, कु. पूजा कल्याण यज्ञेकर व अर्जुन किशोर तांबे या विद्यार्थ्याने ६२.६७ टक्के गुण मिळवून व्दितीय आणि ६२.३३ टक्के गुण मिळवून कु. पूनम भगवान यज्ञेकर हिने तृतीय क्रमांक पटकविला आहे.विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी मा. सौ. छायाराजे विजयसिंह जाधव तसेच प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कनिष्ठ महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे अभिनंदन केले आहे
