समृद्ध’ची स्पर्धा, गावोगावी कामाचा धडाका! सिंदखेडराजा तालुक्यात ग्रामपंचायतींचे ‘पॉवरफुल’ प्रदर्शन’काटोलच्या टीमने ठोकला शेरा – भन्नाट काम!’ झोटिंगा, दरेगाव, वरुडीसह सहा गावांची बाजी; आता पुरस्काराची उत्सुकता शिगेला गटविकास अधिकारी अजित बांगर….

0
IMG-20260513-WA0002

सिंदखेडराजा (प्रतिनिधी अनिल दराडे)”गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास!” हे ब्रीदवाक्य खरे करून दाखवले आहे सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींनी कामाचा असा काही धडाका लावला की तपासणीसाठी आलेल्या काटोलच्या पथकालाही ‘भन्नाट’ म्हणण्याची वेळ आली.१७ सप्टेंबर ते २५ एप्रिल – ‘कामगिरीचा कालखंड’*ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी शासनाने १७ सप्टेंबर ते २५ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा लावली होती. सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत १६ ग्रामपंचायती* या स्पर्धेत उतरल्या. सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य आणि गावकऱ्यांच्या एकजुटीच्या मेहनतीतून गावागावात विकासकामांनी वेग घेतला.’नागपूरकरांनी तपासले, समाधान व्यक्त केले!’स्पर्धेतील कामांची तपासणी करण्यासाठी *काटोल, नागपूर* येथील टीम सिंदखेडराजात दाखल झाली होती. या टीमचे नेतृत्व काटोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी *सचिन सूर्यवंशी* यांनी केले. त्यांच्यासमवेत इतर अधिकारीही होते. तपासणी पथकासोबत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बी. डी. घुगे व विस्तार अधिकारी राजेश्वर पवार* यांनी गावोगावी जाऊन कामाची पाहणी केली.’या’ सहा गावांनी मारली बाजी!तपासणीमध्ये झोटिंगा, दरेगाव, वरुडी, शेंदुर्जन, रूमना आणि महारखेड या सहा ग्रामपंचायतींनी कामांचे जोरदार प्रदर्शन केले. त्यांच्या कामावर तपासणी टीमने विशेष समाधान व्यक्त केले. याशिवाय सावरगाव माळ, जळगाव, सावखेड तेजन, तढेगाव, साखरखेर्डा, सवडत, तांदुळवाडी, मोहाडी या ग्रामपंचायतींची देखील काटेकोर तपासणी करण्यात आली. ‘नियोजन भन्नाट, म्हणूनच तपासणी सुरळीत’ – गटविकास अधिकारी या अभियानाबत बोलताना गटविकास अधिकारी अजित बांगर म्हणाले, “समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुक्यातील स्पर्धेतील टॉपच्या ग्रामपंचायतींनी भरीव कामगिरी केली आहे. पंचायत समितीच्या काटेकोर नियोजनामुळे मूल्यांकन तपासणीची प्रक्रिया सुरळीत पार पडली.”आता ‘वेट अँड वॉच’ – पुरस्कार कुणाला?तपासणी पूर्ण झाली असून आता तालुक्यात एकच चर्चा आहे – ‘पुरस्कार कुणाला भेटणार?’ झोटिंगा, दरेगावसह बाजी मारलेल्या सहा गावांचे पारडे जड मानले जात असले तरी अंतिम निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेमुळे गावांमध्ये विकासकामांना आलेली गती पाहता ‘समृद्ध पंचायतराज’चे स्वप्न नक्कीच साकार होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!