“छत्रपती संभाजी महाराज चौक” नाव द्या; युवासेनेचे नगर परिषदेला निवेदन १३ मेपर्यंत नामकरण न झाल्यास शिवसेना स्टाईलने फलक लावण्याचा इशारा…..!

0
IMG-20260513-WA0004

चिखली(निलेश कोल्हे) शहरातील खामगाव- जालना मार्गावरील सिद्ध सायन्स चौक खंडाळा चौफुली परिसरात “छत्रपती संभाजी महाराज चौक” असे नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी युवा सेनेचे शहर संघटक पंडित अण्णा जेठे यांनी दिनांक १२ मे २०२६रोजी नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनात नेमुद करण्यात आले की सदर चौक परिसरात हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य पुतळा लवकरच स्थापित होणार असून पुतळा स्मारकाचे कामही पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे त्या परिसरात ” छत्रपती संभाजी महाराज चौक” असे अधिकृत नामकरण करण्यात यावी अशी शिवप्रेमी व नागरिकांची भावना असल्याचे निवेदनात म्हटले आहे. युवा सेनेच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला येत्या दिनांक १३ मे २०२६ पर्यंत चौकाचे अधिकृत नामकरण करून फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे .तसेच प्रशासनाने कारवाही न केल्यास दिनांक १४मे २०२६ रोजी शिवसेना स्टाईलने स्वखर्चाने नामकरण फलक लावण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. हे निवेदन युवा सेनेचे संघटक पंडित अण्णा जेठे यांनी मा. मुख्याधिकारी नगरपरिषद चिखली यांना सादर केले आहे. या निवेदनात वर शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप, शिवसेना युवा नेते कपिल खेडेकर ,शिवसेना शहर संघटक पंडित अण्णा जेठे, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर ,विष्णू पोपळघट,गणेश भवर, दादाराव पवार बंडू नेमाने ,विष्णू पोपळघट, रामा पाटील, आकाश महाजन, हरिदास पवार, सतीश जाधव, राजेश पवार, अनिल खरात, विकी परराव, मनोज वाघमारे ,महेश सुरडकर ,गौरव कुलकर्णी, शेख रईस आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतांना शिवप्रेमी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!