शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळावे यासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपा युवा मोर्चा बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील सह जिल्हा पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांना निवेदन…
चिखली (प्रतिनिधी एकनाथ माळेकर) खरीप हंगाम तोंडावर आला असून नांगरणी, वखरणीची कामे जोरात सुरू आहेत. मात्र पेट्रोल पंपावर शेतीकामासाठी कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुक्रवारी (दि. १३) जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे साहेब यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षेचे कारण देऊन पेट्रोलपंपचालक केवळ वाहनांच्या टाकीतच डिझेल भरतात. शेतात काम करणारा ट्रॅक्टर पंपावर नेण्यासाठी शेतकऱ्यांना चालू काम सोडून २ ते ३ तास वाया घालवावे लागतात. येण्या-जाण्यासाठीच डिझेल जळते. वेळेत मशागत न झाल्यास संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली शेतकऱ्याने ट्रॅक्टरची आर.सी. बुक दाखवल्यानंतर दररोज किमान ३००० रुपयांपर्यंतचे डिझेल कॅनमध्ये देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच नाफेड केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होत असून तेथील वाहतुकीसाठीही डिझेल उपलब्ध करून द्यावे, असे नमूद केले आहे. सर्व पेट्रोल पंपांना याबाबत लेखी आदेश देऊन जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत अंमलबजावणी करावी, अशी विनंती करण्यात आली. निवेदनाच्या प्रति जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत. “शेती हा राज्याचा कणा आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी भावना निवेदनकर्त्यानी व्यक्त केली यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील,उपाध्यक्ष विशाल विसपुते, नीरज गायकवाड ता. अध्यक्ष युवा मोर्चा, बंडूभाऊ अंभोरे ता अ. अमडापूर मंडळ सरचिटणीस वैभव लाड, पंढरी भाऊ गावंडे ,तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ शेवाळे, पंजाबराव देशमुख, सतीश गावंडे जिल्हा सहसचिव, दीपक पाटील भाकडे तालुका उपाध्यक्ष, वसुदेव भाऊ राजपूत जिल्हा सहसचिव युवा मोर्चा, फकीर भाऊ कराडे, निलेश मुठ्ठे, अजय खराटे, करण बेंडवाल, प्रतीक गायकवाड, कार्तिक गावडे, मंगल वाघमारे असंख्य भाजप युवा मोर्चा जिल्हा बुलढाण्याचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
