माती’च्या वादातून माणुसकी गाडली! बिबीत ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग, पती-मुलांना बेदम चोप’तक्रार केली तर जिवंत मारू’ – आरोपींची मस्ती; किनगाव जट्टूच्या सहा नराधमांवर गुन्हा दाखल…
सिंदखेडराजा( अनिल दराडे) शेताच्या बांधावरून होणारे वाद विकोपाला गेल्याचे अनेकदा ऐकले असेल, पण बिबी पोलीस स्टेशन हद्दीत तर हद्दच झाली! शेतात माती टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट महिलेच्या विनयभंग आणि कुटुंबाला बेदम मारहाणीपर्यंत पोहोचला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून किनगाव जट्टू, ता. लोणार येथील सहा जणांवर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.सविस्तर वृत्त असे की देवनगर येथील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय फिर्यादी महिलेची शेती बिबी हद्दीत आहे. दि. ५ मे रोजी सकाळी १० वाजता महिला आपले पती व मुलांसह शेतात राबत होती. त्याचवेळी शेजारच्या शेतमालकांनी शेतात माती का टाकली?’म्हणत वादाला तोंड फोडले. बघता-बघता शिवीगाळ सुरू झाली आणि आरोपी थेट महिलेच्या शेतात घुसलेवाद विकोपाला गेल्यावर नराधमांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपींनी महिलेचा हात धरून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करत विनयभंग केला. ‘आईला वाचवा’ म्हणून धावून आलेल्या पती व मुलांनाही या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी बेदम चोपले मारहाण करताना “जर पोलिसांत तक्रार केली तर जिवंत मारून टाकू,” अशी उघड धमकी ही देण्यात आली.’या’ सहा जणांवर गुन्ह्याचे खटलेफिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून बिबी पोलिसांनी अमोल प्रभाकर पालकर, बंडू नारायण राऊत, बाबू नारायण राऊत, अमोल बंडू राऊत, अतुल बंडू राऊत व अक्षय बंडू राऊत (सर्व रा. किनगाव जट्टू, ता. लोणार) या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ७४, ७६, ११८(१), ११८(२), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आर. के. चव्हाण करत आहेत. किरकोळ कारणावरून महिलेची अब्रू वेशीवर टांगण्याच्या या प्रकाराने बिबी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शेतीच्या वादातून वाढणाऱ्या गुन्हेगारीने ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ‘माती’साठी माणुसकी मातीमोल करणाऱ्या नराधमांना कडक शासन करण्याची मागणी जोर धरत आहे.
