बूथ निहाय BLA यांच्या नेमणुका करण्याचा शिवसेनेचा संकल्प पूर्ण करा …शिवसेना नेते प्रतापराव जाधव

0
IMG-20260516-WA0015

बुलढाणा ( बुलढाणा माझा वृत्तसेवा )गाव तिथे शाखा…घर तेथे शिवसैनिक आणि बूथ निहाय BLA यांच्या नेमणुका करण्याचा संकल्प शिवसेनेच्यावतीने करण्यात आला असून प्रत्येक बूथवर BLA नेमणुका लवकरात लवकर पूर्णच्या करण्याच्या सुचना शिवसेना नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत SIR अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या शिवसेना BLA नेमणूक अभियान संदर्भात बुलढाणा शहरातील वारकरी भवन येथील सभागृह येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील आणि चिखली शहरातील सुखकर्ता लॉन्स येथे चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे BLA-2 संदर्भात प्रशिक्षण शिबीर आज 16 मे रोजी संपन्न झाले. त्यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना नेते तथ केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव बोलत होतेया प्रशिक्षण शिबीरास आमदार संजय गायकवाड आणि बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार,शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वक संजय अगलदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. यामुळे आज जनतेकडून आपल्याला पाठिंबा मिळत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन बळकटीकरण, बूथस्तरावरील नियोजन, तसेच स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती कशी राबवावी नामदार प्रतापराव जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आमदार संजय गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की शिवसैनिकांनी हा शिवसेना संघटनेचा आत्मा आहे . येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहे या निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी बुथ निहाय BLA च्या नेमणुका करून संघटन मजबुत करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखओमसिंग राजपूत,युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील शिवाजी देशमुख,निलेश गुजर,शिवसेना तालुका प्रमुख गजानन मोरे,धनंजय बरोटे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.मायाताई म्हस्के अनुजाताई सावळे यांच्यासह बुलडाणा आणि चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!