ठेकेदाराची मानमानी पाण्यासाठी कंडारी ग्रामस्थांचा आमरण उपोषणचा इशाराजलजीवन मिशनचे निकृष्ट काम अध्याप पर्यंत गावात पाणी नाही…
सिंदखेडराजा( एकनाथ माळेकर )तालुक्यातील कंडारी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनाचे काम ठेकेदारानी पूर्ण झाल्याचे दाखवूनही गावात अद्याप पाणीपुरवठा सुरू न झाल्याने गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा आणि पाण्यापासून गावकऱ्यांना वंचित ठेवल्याबद्दल संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कंडारीच्या ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत गावात एकदाही नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेत महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.यापूर्वीही ग्रामस्थांनी अनेक वेळा तोंडी, लेखी तक्रारी, निवेदने व विनंती अर्ज सादर केले. तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्न मांडला. मात्र प्रत्येक वेळी आश्वासनांची खैरात देत ग्रामस्थांची दिशाभूल केली असल्याने आहे.प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कंडारी गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, मारोती मंदिराजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा शिवाजी खरात, विद्याधर घुगे, संतोष जायभाये, स्वप्नील कायंदे, प्रद्युम्न कायंदे, रमेश कायंदे, मदन कायंदे, आत्माराम घुगे, आशोक नागरे, अरुण कायंदे आदी ग्रामस्थांच्या आपल्या सह्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे
