बुलढाणा शहर पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई; १०,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त, ४ जणांवर गुन्हे दाखल…
बुलढाणा (बुलढाणा माझा न्यूज):
बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे कडक निर्देश असतानाही, चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या गावरान हातभट्टी आणि अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील जुनागाव परिसर आणि खामगाव रोडवरील आठवडी बाजार भागात पोलिसांनी अचानक धाडी टाकून एकूण १० हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ४ आरोपींविरुद्ध चार वेगवेगळ्या केसेस दाखल करण्यात आल्या असून, तीन ठिकाणच्या अवैध दारू भट्ट्या पूर्णपणे तोडून उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या विश्वासनीय माहितीनुसार, जुनागाव परिसरामध्ये काही इसम चोरून-लपून अवैध गावरान हातभट्टीची दारू गाळून तिची विक्री करत होते. तसेच खामगाव रोडवरील आठवडी बाजार भागात छुप्या पद्धतीने देशी दारूची विक्री सुरू होती. या माहितीच्या आधारे बुलढाणा शहर पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास या दोन्ही भागात एकाच वेळी विशेष मोहीम राबवून ही धडक कारवाई केली.
अशी झाली कारवाई व जप्त मुद्देमाल
खामगाव रोड परिसर या ठिकाणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १७ देशी दारू संत्रा क्वार्टर जप्त करण्यात आल्या.
जुनागाव परिसर या भागात गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्या तीन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल ९० लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
४ आरोपींवर ४ गुन्हे दाखल करून ३ ठिकाणच्या भट्ट्या जागेवरच नष्ट करण्यात आल्या आहेत.
यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई
सदरची धडक कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री. निलेश तांबे (भा.पो.से.),अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री. अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री. सुधीर पाटील यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मा.श्री. संग्राम पाटील यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली डीबी टीमचे पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे,पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप कायंदे (ब.नं. ४३५), महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता अराख (ब.नं. १९३५), पोलीस कॉन्स्टेबल मनोज सोनुने,सुशिल जाधव,विनोद बोरे (ब.नं. ४२५) तसेच आर.सी.पी. (RCP) पथकातील जवानांनी ही यशस्वी कामगिरी बजावली. पोलिसांच्या या तडकाफडकी कारवाईमुळे तालुक्यातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
