जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; 18 लाख 83 हजार लिटर इंधन दाखलअफवांवर विश्वास ठेवू नका, अतिरिक्त खरेदी टाळा : जिल्हाधिकारी यांचे आवाहन…

0
FB_IMG_1779762846348

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ): जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दि. 25 मे 2026 रोजी विविध ऑईल कंपन्यांकडून जिल्ह्याला एकूण 18 लाख 83 हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, अतिरिक्त स्वरूपात इंधन साठवू नये आणि गरजेपुरतेच पेट्रोल-डिझेल खरेदी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.प्राप्त माहितीनुसार, भारत पेट्रोलियम (BPCL) कडून 1 लाख 10 हजार लिटर पेट्रोल व 3 लाख 50 हजार लिटर डिझेल, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) कडून 1 लाख 40 हजार लिटर पेट्रोल व 4 लाख 3 हजार लिटर डिझेल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) कडून 4 लाख 50 हजार लिटर पेट्रोल व 4 लाख 30 हजार लिटर डिझेल प्राप्त झाले आहे, असे एकूण जिल्ह्याला पेट्रोल 7 लाख तर डिझेल 11 लाख 83 हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे. पुढील काळातही दररोज इंधन साठा जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या तसेच पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात असून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल सुरळीतपणे उपलब्ध होत आहे. इंधन वितरण सुरळीत राहावे यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!