चिखली तालुका वाळवंट होण्याच्या मार्गावर; दिवसाढवळ्या ‘हिरवी कत्तल’!​वनविभागाच्या डोळ्यांदेखत लाखो रुपयांची अवैध वृक्षतोड व लाकूड तस्करी सुसाट​ संतापजनक : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ योजनेचा फज्जा; अधिकाऱ्यांच्या ‘मूकसंमती’ने हप्तेखोरीला बळ?

0
IMG-20260527-WA0055

चिखली (एकनाथ माळेकर) बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेल्या चिखली तालुक्यातील सर्वच गावांच्या शिवारात अवैध वृक्षतोडीने कहर केला आहे. शासनाची झाडे लावा झाडे जगवा ही योजना असून सुद्धा अमाप वृक्षतोड सुरू आहे शासनाने हजारो नवे लाखो नवे करोडो रुपये खर्च करून लागवडीवर भर दिला आहे कुऱ्हाडबंदी असतानाही सर्रासपणे उभ्या झाडांवर माशणारी यंत्रे चालवून पर्यावरणाची अपरिमित हानी केली जात आहे. कापलेली लाकडे ट्रॅक्टरमधून धडधडीतपणे वाहतूक केली जात असताना वनविभागाचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संतप्त आरोप सुज्ञ ‌ नागरिक व वृक्षप्रेमींनी केला आहे.1. संपूर्ण तालुक्यात कत्तल: चिखली तालुक्यातील एकही गाव सुटले नाही. गेल्या महिनाभरापासून सर्व गावांच्या शिवारात हिरवीगार, डेरेदार झाडे दिवसाढवळ्या तोडली जात आहेत. सकाळ पासून रात्रीपर्यंत माशणारी यंत्रांचा आवाज संपूर्ण तालुक्यात घुमत आहे.2. संरक्षित झाडांवरही घाव: आंबा, निंब, चिंच, बाभूळ यांसह वन विभागाच्या परवानगीशिवाय न तोडता येणाऱ्या सागवान झाडांचीही निर्धास्तपणे कत्तल व विक्री सुरू आहे. शेतांच्या धुऱ्यांवरील, नदी-नाल्याकाठची व गावालगतची झाडेही शिल्लक ठेवली जात नाहीत.3. खुलेआम वाहतूक, कारवाईचा प्रश्न कापलेली झाडे ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये भरून तालुक्यातील प्रमुख मार्गांवरून खुलेआम वाहतूक केली जात आहे. वनपाल, वनरक्षक व वनक्षेत्रपाल यांना याची पूर्ण कल्पना असताना ते FIR दाखल करून वाहने जप्त करण्याची कारवाई करतील का? असा सवाल सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत?4. पर्यावरणावर गंभीर परिणाम बुलढाणा जिल्ह्याचे तापमान आधीच 45 अंशांवर गेले आहे. तालुक्यातील वृक्षतोड झाल्याने हवेची गुणवत्ता ढासळली असून भूजल पातळी खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचे प्रमाण घटून दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवेल, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.5. भ्रष्टाचाराचा संशय एकीकडे शासन वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ‘हरित महाराष्ट्र’चा गजर करत आहे, तर दुसरीकडे प्रशासनातील काही घटकांच्या मूकसंमतीने संपूर्ण चिखली तालुका उजाड होण्याच्या मार्गावर आहे. “कारवाई होत नसल्याने ‘हप्ते’ संस्कृतीला बळ मिळत आहे का?” असा सवाल वृक्षप्रेमींनी केला आहे.महाराष्ट्र झाडे तोडण्यास प्रतिबंध व संरक्षण अधिनियम 1964 नुसार विनापरवाना झाड तोडणे हा दखलपात्र गुन्हा असून 1 वर्ष कारावास व 5000 रु. दंडाची तरतूद आहे. वन कायदा 1927 कलम 41, 42 नुसार विनापरवाना लाकूड वाहतूक केल्यास वाहन जप्ती व 2 वर्षे कारावासाची शिक्षा आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर IPC 166A अन्वये कारवाई होऊ शकते.1. संपूर्ण चिखली तालुक्यातील अवैध वृक्षतोड तात्काळ थांबवावी व गेल्या 3 महिन्यातील सर्व वृक्षतोड प्रकरणांची SIT मार्फत चौकशी करावी.2. दोषी ठेकेदार, वाहतूकदार व त्यांना अभय देणाऱ्या वनअधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करावी.3. जप्त केलेली लाकडे व वाहने शासन जमा करून त्याचा लिलाव करावा.4. तोडलेल्या प्रत्येक झाडामागे 10 झाडे लावण्याची सक्ती संबंधितांकडून करून घ्यावी.5. तालुक्यातील सर्व गावांसाठी वृक्षतोड प्रतिबंधक भरारी पथक’ नेमून 24×7 गस्त घालावी.”वेळीच कारवाई न झाल्यास संपूर्ण चिखली तालुका उजाड होण्यास वेळ लागणार नाही. तापमान 50 अंशांवर जाईल व पुढच्या पिढीला शुद्ध हवा मिळणार नाही. वनविभागाने तात्काळ जागे होऊन FIR व जप्तीची कारवाई करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” असा इशारा वृक्षप्रेमी नागरिकाने दिला आहे.तरी बुलढाणा उपवनपाल अधिकारी हे चिखली तालुक्यावर लक्ष देतील का याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे तूर्तास एवढे बाकी पुढील भागात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!