बुलडाणा माझा’चा दणका : बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन जागे; ताडशिवणी येथील बंद हापशी अखेर दुरुस्त!​ग्रामपंचायत सदस्य अमोल खरात यांच्या पाठपुराव्याला आणि ‘बुलडाणा माझा’च्या वृत्ताला मोठे यश; गावकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला

0
Screenshot_2026-05-28-14-31-04-48_680d03679600f7af0b4c700c6b270fe7


​बिबी (ब्रह्मानंद वाकोडे)
सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी गावातील तीव्र पाणीटंचाई आणि प्रशासकीय उदासीनतेबाबत ‘बुलडाणा माझा’ ने काल प्रसिद्ध केलेल्या बातमीची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. वृत्त प्रसारित होताच संबंधित यंत्रणेत एकच खळबळ उडाली आणि अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेली गावातील मुख्य हापशी (हातपंप) प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्त केली. यामुळे ताडशिवणीकरांना मोठा दिलासा मिळाला असून, ‘बुलडाणा माझा’च्या वृत्ताचा हा मोठा ‘इम्पॅक्ट’ मानला जात आहे.
​ताडशिवणी गावातील मुख्य हातपंप गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी येथील महिला, वृद्ध आणि बालकांना ऐन उन्हाळ्यात वणवण भटकावे लागत होते
. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य अमोल अशोकराव खरात यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा, गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेड राजा तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे अधिकृत तक्रारी करून सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नव्हती.
​ग्रामस्थांची हीच हेलपट आणि लोकप्रतिनिधींचा लढा बुलडाणा माझा’ने कालच्या अंकात अतिशय ठळकपणे मांडला होता. या वृत्ताची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली. सिंदखेड राजा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने हालचाली करत आज सकाळीच तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक गावात पाठवले. अनेक दिवसांपासून बंद पडलेली ही मुख्य हापशी काही तासांतच दुरुस्त करण्यात आली. आता या हापशीला पाणी आल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!