पाडळी शिंदे येथील दोन महिला गटांना सरकी बॅग वाटप…
देऊळगाव राजा (एकनाथ माळेकर):-येथील दोन शेतकरी गटांना २३जून रोजी राष्ट्रीय कापूस उत्पादन कार्यक्रमा अंतर्गत (HDPS )केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर ने कपाशी साठी संघन लागवड प्रणाली विकसित केली आहे. ज्यामध्ये कोरडवाहू शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्याची क्षमता आहे.समकालीन कॉम्पॅक्ट बिजी-२ संकरासाठी उथळ आणि लाल व काळी कोरडवाहू शेतीमध्ये ९०बाय१५अंतरावर लागवड करणे अधिक योग्य आहे. त्या साठी पाडळी शिंदे येथील दोन्ही गटांची निवड झाल्याने त्या गटाचे २३जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज महिला शेतकरी बचत गट व नैसर्गिक शेती महिला शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गट या दोन्ही गटातील महिलांना राशी सीड्स कंपनीचे RCH_971 बिजी टू स्विफ्ट कंपनीचे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी दोन्ही गटांचे अध्यक्ष व सचिव तसेच सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत सहाय्यक कृषी अधिकारी जी एन खंदारे यांनी वाटप केले व HDPS या संघन लागवडी बद्दल शेतकरी वर्गांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच पती राजू ठेंग, रामेश्वर वायाळ,सौ सोनल शिंदे,अंकुश वायाळ प्रगतशील शेतकरी,समाधान खरात,सदाशिव शिंदे, गणेश गोरसे, सुभाष वायाळ,ज्ञानेश्वर देशमुख, माजी सरपंच अर्चना वायाळ ,गावकरी मंडळी उपस्थित होते.
