कलकत्ता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत हजारो नागरिकांनी केला सामूहिक योगभ्यास….

0
IMG-20260621-WA0017

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कलकत्ता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत सकाळीच हजारो नागरिकांनी योगभ्यास केला .”योग केवळ जीवनशैलीसाठीच नव्हे, तर जगाच्या अधिक चांगल्या भविष्यासाठी आवश्यक आहे,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकात्यातील रेड रोड येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचं महत्त्व अधोरेखित केलं. योग ही मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असून तो सर्वांना जोडणारा आणि संतुलित, निरोगी व तणावमुक्त जीवनाचा मार्ग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सामूहिक योगाभ्यास”निरामय वार्धक्यासाठी योग” या वर्षाच्या संकल्पनेवर भरयोगाला जागतिक स्तरावर मिळालेल्या वाढत्या मान्यतेचा उल्लेख यावेळी करण्यात आला .स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील ऐतिहासिक उद्गारांपासून सुरू झालेला भारताच्या योगशक्तीचा प्रवास आज ‘वंदे मातरम्’पासून ‘वंदे योग’पर्यंत सशक्तपणे पोहोचला आहे अस मत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलआदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आज योग १८० हून अधिक देशांमध्ये जागतिक आरोग्य जनआंदोलन बनला आहे. या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगत, योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया असे आवाहन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केलाआदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी जागतिक पातळीवर २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतीय परंपरा आणि संस्कृतीवर जागतिक पातळीची उमटलेली ही एक मोहोरच होती. आज जगभरात योग साधनेचा झालेला प्रचार आणि प्रचार हे निश्चितच आजच्या जागतिक योग दिनाचं यश म्हणावं लागेल असेही ते म्हणाले कोलकत्ता येथे झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये योग साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!