श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…

0
IMG-20260619-WA0053

सिंदखेडराजा (अनिल दराडे) श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उन्हाळी २०२६ परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून एकूण ९१.८६% निकाल लागला आहे. बी. एस्सी. तृतीय वर्षामध्ये एकूण १२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८३ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून यामध्ये १७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.Bio group मध्ये पायल सतीश म्हस्के या विद्यार्थिनीने ७८.०५ % मिळवून प्रथम, पायल बद्रिनारायन मांटे हीने ७४.५० % गुण मिळवून दितीय व आकांक्षा सुरेश उकरडे हिने ७३.९४ % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.Math ग्रुप मध्ये आयेशा परवीन फेरोज शेख हिने ८०.०९ % गुण मिळवून प्रथम, राफिया जब्बार शेख हिने ७४.८३ % गुण मिळवून द्वितीय व जिशान जावेद खान याने ७३.४९ % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!