शेतकरी आंदोलनाचा ‘विराम’, पण ‘युद्ध’ बाकीच: रविकांत तुपकरांच्या अटीवर सरकारला चार दिवसांची मुदत!

0
Oplus_16908288

Oplus_16908288


बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी आणि हक्काच्या कर्जमुक्तीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आपले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी बुलढाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा केल्यानंतर, सरकारने मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी चार दिवसांचा वेळ मागितला आहे. 15 जून पासून शेतकरी मागण्यांसाठी तुपकर यांनी उपोषण सुरू ठेवले होते. या आंदोलनाची तीव्रता पाहून राज्य सरकारला अखेर हालचाल करावी लागली. गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सरकारने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याने, तुपकर यांनी आंदोलनाला तात्पुरता पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलन स्थगित झाले असले तरी, रविकांत तुपकर यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सरकारला खडसावले आहे. त्यांनी म्हटले आहे की,
“आम्ही हे आंदोलन संपवलेले नाही, तर केवळ स्थगित केले आहे. जर येत्या चार दिवसांत सरकारने मागण्यांवर ठोस आणि सकारात्मक तोडगा काढला नाही, तर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू आणि हे आंदोलन पूर्वीपेक्षाही अधिक तीव्र असेल.”आता संपूर्ण राज्याचे लक्ष सरकार काय निर्णय घेते, याकडे लागले आहे. ही चार दिवसांची मुदत आता संपण्याची प्रतीक्षा असून, शेतकरी वर्गामध्ये या संदर्भात मोठी उत्सुकता आणि तितकीच धाकधूकही आहे. तुपकरांच्या या भूमिकेमुळे सरकारने दिलेले आश्वासन पाळणे आता अनिवार्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!