बुलढाणा तालुक्यातील साखळी बु. गावाची पाणीटंचाई दूर; प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर….

0
1781851747285

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील साखळी बु. गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.साखळी बु. येथे 2859 पशुधन व 7689 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 1 लाख 61 हजार 695 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, बुलढाणा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!