प्रतिष्ठित समाजसेवक व उद्योजक विजय जयस्वाल यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीप्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेची महत्त्वाची जबाबदारी
चिखली(निलेश कोल्हे )चिखली शहरातील प्रतिष्ठित उद्योजक, समाजसेवक तसेच विजय रेडिमेड व आशीर्वाद मंगल कार्यालयचे संचालक विजय जगदीश जयस्वाल यांची भारत सरकार मान्यता प्राप्त प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्ती हि प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.दिलीपजी मोहीते सर यांनी नियुक्ती केली आहे.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.विजय जयस्वाल हे यशस्वी उद्योजक असण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. दरवर्षी चिखलीच्या आराध्यदैवत श्री माता रेणुकादेवी यात्रेनिमित्त शहरात येणाऱ्या हजारो भाविकांसाठी डि.पी. रोड परिसरात स्वखर्चाने भव्य महाप्रसादाचे आयोजन करून ते समाजसेवेचा आदर्श निर्माण करतात.तसेच ते जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून ग्रामीण व शहरी भागातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमातील पत्रकारांना संघटित करण्याचे कार्य करत आहेत. पत्रकारांच्या विविध समस्या, अडी-अडचणी शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. पत्रकारांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.मानवाधिकार संरक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि जनजागृतीच्या क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिखलीसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून सामाजिक, पत्रकार, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विजय जयस्वाल यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात मानवाधिकार संरक्षण व महिला सुरक्षा विषयक कार्याला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
