सिंदखेडराजा तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी; तहसीलदारांनी स्वतःच्या मुलीला पाजली लस..

0
IMG-20260628-WA0000

सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यात राबविण्यात आलेली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या नियोजनामुळे यशस्वी झाली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे तालुक्याचे तहसीलदार यांनी स्वतःच्या मुलीला पोलिओचा डोस पाजून लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आणि जनजागृती केली.संपूर्ण तालुक्यात 0 ते 5 वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन लसीकरण केले. प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत मोहीम यशस्वी केली. तालुक्यातील सर्व गावांमध्ये बूथ लावून तसेच दवंडी देऊन जनजागृती करण्यात आले. या मोहिमेत सिंदखेडराजा तालुक्याचे तहसीलदार यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या मुलीला पोलिओचा डोस पाजत सर्व पालकांना आवाहन केले की, “पोलिओसारखा आजार हद्दपार करण्यासाठी एकही बालक लसीपासून वंचित राहता कामा नये. शासनासोबत नागरिकांनीही जबाबदारीने सहभाग घ्यावा.” त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला आणि लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला.तालुक्यातील ग्रामीण भागातही पालकांनी मोठ्या संख्येने मुलांना लस देण्यासाठी बूथवर गर्दी केली. “आमचे मूल सुरक्षित राहावे म्हणून आम्ही डोस देणारच” अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली.पल्स पोलिओ मोहीम यशस्वी केल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!