बुलढाण्यात बोगस डॉक्टराचा पर्दाफाश; परतापूर येथे गर्भलिंग निदान करताना रंगेहात अटक…

0
Screenshot_2026-06-28-12-53-44-34_680d03679600f7af0b4c700c6b270fe7

मेहकर (बुलढाणा माझा न्युज ):मेहकर तालुक्यातील परतापूर येथे एका घरात अत्यंत गोपनीयरीत्या सुरू असलेल्या बोगस गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग व पोलिसांनी संयुक्त धाड टाकून एका बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले. या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशिन आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, परतापूर येथील रसाळ यांच्या घरी बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळाली होती. त्यानुसार, डॉ. बिराजदार यांनी पीसीपीएनडीटी (PCPNDT) पथकाला तातडीने अलर्ट केले.शनिवारी सकाळी अकरा वाजेपासूनच मेहकर ग्रामीण रुग्णालयाचे पथक आणि मेहकर पोलिसांच्या पथकाने रसाळ यांच्या घराभोवती सापळा रचला होता. दुपारी अडीच-तीनच्या सुमारास आरोपी बोगस डॉक्टर अनिल रामदास सोनुने हा घरात शिरला आणि एका महिलेची सोनोग्राफी करू लागला. त्याचक्षणी पथकाने छापा टाकून त्याला रंगेहात पकडले.घटनास्थळावरून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशिन आणि अन्य वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी डॉक्टर अनिल सोनुने आणि घरमालक रसाळ यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईत मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार व त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!