चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने वटपौर्णिमेला वडाची 101 झाडे वाटून वट सावित्री पौर्णिमा साजरी.
चिखली (एकनाथ माळेकर)हिंदू संस्कृती मध्ये स्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सुखी वैवाहिक जीवनासाठी मनोभावे वडाची पूजा करतात.धार्मिक दृष्ट्या महत्वाचे असलेले हे वडाचे झाड वैज्ञानिक दृष्ठ्या ही खूप महत्वाचे आहे ते उच्च ऑक्सिजन निर्मिती करते, उन्हाळ्यात बाष्पीभवनाद्वारे जवळपास 2 टन पाणी वातावरणात सोडते त्यामुळे तापमान कमी होण्यास मदत होते. हवेतील विषारी वायू शोषते. जैवविविधतेच्या दृष्ठीने ही वडाचे झाड खूप महत्वाचे आहे, पक्षी, खारी, मधमाश्या यासह असंख्य जीवाचे ते आश्रयस्थान आहे. हे वैज्ञानिक महत्व लक्षात घेऊन हिंदु संस्कृतीत याला पूजनीय स्थान दिले गेले आहे.परंतु आज रोड रस्ते, विकासाच्या कामात ही झाडे कमी होत चाललेली आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली च्या वतीने बेराळा, मुरादपूर, रामनगर, मेरा खुर्द, देऊळगाव घुबे, कोणड, अमोना, मंगरूळ, अंचरवाडी या गावी ऐकून 101 वडाच्या झाडांचे संगोपणासाठी वाटप करण्यात आले. यावेळी प्रत्येक गावात प्रतियोगिता आयोजित करून जी महिला पुढील वर्षी सर्वात चांगले झाड वाढवेल तिला पैठणीचे बक्षीस ही जाहीर केले.सदर वडाची झाडे ही जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोन्द्रे चिखली तालुका अध्यक्ष संतोष परिहार, यांच्या शुभहस्ते व राजेंद्र सुरडकर, भगवान बाप्पू, अनंथा गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, रामेश्वर इंगळे, रमेश अवचार, मापारी ठेकेदार,ग्रामसेवक वीर साहेब, उपसरपंच मेरा,रामदास मुजमुले, राजेंद्र घुबे,अमोल घुबे,विजय जावळे, प्रल्हाद इंगळे,गजानन पाटिलबा इंगळे, दत्तू गावडे, ग्रामसेवक सोळंकी,दामुअण्णा शिंदे,दत्तात्रय रुपसिंग परिहार. सतीश सोनुने, पांडुरंग भवर यांच्या उपस्थितीत प्रत्येक गावच्या उपस्थित सुवासिनी माता भगिनी यांना वाटप करण्यात आले.
