पोलीस स्टेशन अढेरा यांचे मार्फत कार्यशाळेचे आयोजनअंमली पदार्थ सेवन न करण्याचे केले आवाहन….
देऊळगाव राजा ( एकनाथ माळेकर)औढेश्वर विद्यालय अंढेरा येथे मा.श्री. निलेश तांबे साहेब पोलीस अधिक्षक बुलढाणा,श्री अमोल गायकवाड साहेब अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा मा.श्रीमती मनिषा कदम उपविभागीय पोलिस अधिकारी, देऊळगाव राजा यांचे मार्गदर्शनाखाली ” मिशन परिवर्तन” या मोहिमेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळे दरम्यान पोलीस स्टेशन अढेरा प्रभारी अधिकारी आशिष रोही यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गांजा, ड्रग्ज यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन करू नये तसेच अंमली पदार्थांचे सेवनाचे दूष्परिणाम याबाबत माहिती दिली.
तसेच अंमली पदार्थाची विक्री जवळ बाळगने व त्यांचे सेवन करणा-या वर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत असे सांगितले.
तसेच कार्यशाळे दरम्यान ठाणेदार यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे,जवळ बाळगणारे तसेच अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्ती बाबात पोलीस स्टेशन अढेरा येथे माहिती देण्याचे आवाहन केले तसेच माहीती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे सांगितले.
सदर कार्यशाळेसाठी पोलीस स्टेशन अढेरा प्रभारी अधिकारी आशिष रोही, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल, पोलीस अंमलदार शिवानंद खापर्डे, अमोल रोरे तसेच औढेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सरोदे सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.
