संतोष भुतेकर सचिन कदम यांचे निवेदन… महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचे आदेश आणि पहिल्यांदाच जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर दबंग कारवाईला सुरुवात….

IMG-20250815-WA0021


चिखली( एकनाथ माळेकर )चिखली आणि देवळगाव राजा तालुक्यातील अवैध वाळू उपसा सिंचन जोरात सुरू आहे हे सर्व लोकांना दिसत आहे जिल्हा अधिकारी साहेब आज जी पाहणी केल ते या अगोदर केलं असतं तर हि परिस्थिती निर्माण झाली नसती 14ऑगस्ट च्या रात्री मंडप गाव सुलतानपूर बायगाव चिंचखेड इसरुळ या गावांमधून झाले असे की खडक पूर्ण प्रकल्पातून बोटीद्वारे उपसल्या जाणाऱ्या अवैध रेती अनेक आंदोलने केल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांनी अनेक कारवाया करून थांबता थांबेना या ना त्या मार्गाने रेती चोरी सुरूच आहे परंतु त्या विरोधात आवाज उठवणारे संतोष भुतेकर सचिन कदम हेही थांबता थांबायला तयार नाही हा खेळ सातत्याने गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे 9 ऑगस्ट रोजी महसूल मंत्री बावनकुळे साहेब जिल्ह्यात येणार असल्यामुळे संतोष भुतेकर आणि सचिन कदम यांनी निवेदन देण्याची तयारी केली परंतु पोलिस काही केल्या संतोष भुतेकर सचिन कदम याना मंत्री महोदय याना भेटु देत नव्हते आंदोलन कर्ते यांच्या मुळे मंत्री महोदय दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून बुलढाण्याला जात असताना चिखली तेच दोघांना ताब्यात घेतले व निवेदन देण्यास नकार दिला परंतु आंदोलन कर्ते यांनी आक्रमक पवित्र घेतल्या मुळे काहीही झाले तरी निवेदन दिल्याशिवाय थांबणार नाही ही भूमिका घेतल्यानंतर बुलढाणा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय भाऊ गायकवाड याणी भुतेकर व कदम यांना समजावून सांगत पोलीस वाल्यांना विश्वास दिला त्यानंतर पोलीस प्रोटेक्शन मध्येच दिवसभर ताब्यात ठेवून साडेपाच वाजता भुतेकर व कदम यांनी निवेदन सादर केले बावनकुळे साहेबांना हे निवेदन प्रत्यक्ष दिले असले तरी या अगोदर सुद्धा ई-मेल द्वारे त्यांच्या ऑफिसला स्पीड पोस्टद्वारे मागच्या आठवड्यात भुतेकर यांनी तक्रार केलेली होती इतरही वारंवार होणाऱ्या तक्रारी च्या अनुषंगाने बावनकुळे साहेबांनी महसूल प्रशासनाला विशेष म्हणजे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक साहेब यांना खडे बोल सुनावले व याला तुम्हीच जिल्हाधिकारी यांना त्यांनी जबाबदार असून मला कारवाई लागेल आसे आदेश दिल्यानंतर 14 ऑगस्ट च्या संध्याकाळी अचानक जिल्हाधिकारी महोदय देऊळगाव मही मार्गे मंडपगाव सुलतानपूर चिंचखेड कडे आले रस्त्याने जात असताना जिथे कुठे विना नंबरचे टिप्पर उभे दिसेल अशा जवळपास 54 गाड्यांवर दंडात्मक कारवाई प्रत्यक्ष फाईन मारला विशेष म्हणजे गावकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा सुद्धा केली मंडपगाव येथे सरपंच सचिन कदम यांच्यासह अनेक गावकरी हे इसरूळ मध्ये विनोद भुतेकर व त्या क्षणी काही गावकरी उपस्थित असताना त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करत असताना साहेबांनी मान्य केले की खरच तुमच्या रस्त्याचे हाल खूप गंभीर झाले ही अवैध रेती वाहतूक थांबवणे गरजेचेच उशिरा का होईना साहेबांना सत्य काय ते कळाले साहेब एकदा धरणात रेती उपसणाऱ्या असंख्य बोटीवर आपली नजर पडली पाहिजे .कारवाई दरम्यान उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे साहेब हे सुद्धा उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!