NDRF निकषानुसार महापुरामुळे खरडुन गेलेल्या जमिनीला शासन निर्णयाप्रमाणे प्रति हेक्टरी ४७ हजार रुपये अनुदान द्या-मनसेची मागणी
चिखली (एकनाथ माळेकर) शहरासह संपूर्ण तालुक्यात दि. १८ ऑगष्ट २०२५ रोजी ढगफुटी सदृश्य अतीवृष्टी झाली झालेल्या संतधार पावसामुळे येळगांव प्रकल्प पूर्णपणे भरल्याने पैनगंगा नदीला प्रचंड प्रमाणात पुर आला चिखली तालुक्यात पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीन आपला प्रवाह बदलल्याने सोमठाणा, दिवठाणा, पेठ, बोरगांव वसु, पांढरदेव, घानमोड, मानमोड, दहिगांव, बोरगांव काकडे या गावातील नदी काठच्या सर्व शेतजमीनी पुराच्या पाण्याने खरडुन गेल्या आहे. शेतकऱ्यांचा संपुर्ण शेतमाल या पुराच्या पाण्याने वाहुन गेला आहे. पुर बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी मनसेच्या वतीने दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी तहसीलदार चिखली यांना निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तहसिलदार यांनी झालेल्या नुकसानीच सरसकट पंचनामे करुन मदत करण्याचे जाहिर केले आहे. मात्र नदी काठच्या जमीनी पुराच्या पाण्याने खरडुन वाहुन गेल्यामुळे जमीनीमध्ये माती सुध्दा शिल्लक राहीलेली नाही. यंदाचे पिक हातचे गेलेले असुन पुढील ३ ते ४ वर्ष सदर जमिनी पिक घेण्या लायक सुध्दा राहिलेल्या नाही. त्यामुळे पैनगंगा नदी काठच्या सर्व पुर बाधीत शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाचे सरसकट मदतीसह शासन निर्णय क्र. सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३ दि.२७ मार्च २०२३ नुसार महसुल अभिलेखानुसार शेत जमीनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भुधारक शेकऱ्यांना रु.४७,०००/- प्रति हेक्टर या दराने अतिरीक्त मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
