नागरे महाविद्यालयात एकात्म मानव दर्शन या व्याख्यान मालेच्या हीरक महोत्सवी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

IMG-20250826-WA0015

सिंदखेडराजा (अनिल दराडे )दि 26 ऑगस्ट 2025 रोजी नारायणराव नागरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन विचार विशद करणाऱ्या व्याख्यानांना साठ वर्षे पूर्ण होत आहे या हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रामुख्याने बेटी बचाव बेटी पढाव ,वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत सुंदर भारत , अंधश्रद्धा निर्मूलन, रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा, पोस्टर प्रेसेंटेशन, व्याख्याने, चर्चासत्र अशी विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये एकात्म मानव दर्शन या व्याख्यानमारीच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय नागरे (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य)
यांनी राबविले . या कार्यक्रमांमध्ये
पहिली स्पर्धा -निबंध स्पर्धा या स्पर्धेमध्ये –
प्रथम स्थान – शेख कनिज
द्वितीय स्थान – गौरी कोंढाणे
तिसरे स्थान – वेदांत दराडे या विद्यार्थ्यांनी पटकावले .

दुसरी स्पर्धा – रांगोळी स्पर्धा – या स्पर्धेमध्ये –
प्रथम स्थान – श्रावणी जाधव
द्वितीय स्थान – अश्विनी नागरे
तिसरे स्थान – रूपाली देशमुख
या विद्यार्थ्यांनी पटकावले .

तिसरी स्पर्धा -पोस्टर कॉम्पिटिशन यामध्ये –
प्रथम स्थान – अश्विनी नागरे
द्वितीय स्थान – श्रावणी जाधव
तिसरे स्थान – रूपाली देशमुख या विद्यार्थ्यांनी पटकावले .
तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सहकार्यक्रमाधिकारी प्रा .नयना गवारे प्रा . शेख युनूस प्रा . देवानंद नागरे डॉ . दीपक देशमाने डॉ . गणेश घुगे प्रा. मिलिंद गवई प्रा. सत्यम श्रीवास्तव प्रा. शंकर महेर प्रा. राम पोखरकर श्री अनिल रानमळे श्री गजानन मुंडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

You may have missed

error: Content is protected !!