सिंदखेड राजा येथे पोलिसांचे पथसंचलन व मॉब डिस्पोझल प्रॅक्टिस….

IMG-20250901-WA0024

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत सिंदखेड राजा शहरात पोलिसांच्या वतीने पथसंचलन तसेच मॉब डिस्पोझल प्रॅक्टिस आयोजित करण्यात आली.
आगामी गणेशोत्सव व शहरातील मुलाखत अनुषंगाने मा. पोलिस अधीक्षक बुलडाणा यांच्या आदेशाने व मा. अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सौ. मनीषा कदम यांच्या उपस्थितीत हे पथसंचलन पार पडले.
यावेळी शहरातील प्रमुख मार्ग तसेच मिश्र वस्ती भागातून पथसंचलन काढण्यात आले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मॉब डिस्पोझल प्रॅक्टिस घेण्यात आली.
या कार्यक्रमात 2 अधिकारी, 10 पोलिस अंमलदार, दे राजा RCP चे 15 जवान आणि 25 होमगार्ड सहभागी झाले होते.

You may have missed

error: Content is protected !!